शोभिता शिवन्ना आत्महत्या
शोभिता शिवन्ना आत्महत्या: कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळल्या आहेत. कथितरित्या त्यांनी आत्महत्या केली आहे. टेलिव्हिजन आणि सिनेमा क्षेत्रातील अभिनयासाठी त्या ओळखल्या जात होत्या. ३० वर्षीय शोभिता यांनी कथितपणे काल, म्हणजेच ३० नोव्हेंबरच्या रात्री उशिरा आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच कन्नड सिनेसृष्टीमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

शोभिता शिवन्ना आत्महत्या:
कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी शोभिता या विवाहित होत्या आणि गेल्या दोन वर्षांपासून हैदराबादमध्ये राहत होत्या. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूचे कारण अद्यापहि स्पष्ट झालेले नाही. सध्या अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येची दाट शक्यता आसल्याचे बोलले जात आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आहे. अहवालानुसार, अंतिम संस्कारासाठी शोभिता यांच्या पार्थिवाला बेंगळुरू येथे नेले जाण्याची शक्यता आहे.
Also Read: https://coveragezone31.com/australia-ban-social-media-for-under-16s/
शोभिता शिवन्ना आत्महत्या:
या प्रकरणी माहिती देताना पीएस गचिबोवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणाले की, कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पं.स.गचीबोवली हद्दीतील कोंडापूर येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

शोभिताने खालील चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले
शोभिताने कन्नड टेलिव्हिजनमधून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती . गेल्या काही वर्षात तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर कन्नड सिनेसृष्टी मध्ये चांगलीच ओळख निर्माण केली होती . तिने 12 हून अधिक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे, ज्यात गलीपाता, मंगला गोवरी, कोगिले, कृष्णा रुक्मिणी, दीपावू निनादे गलीयू निनाडे आणि अम्मावरू यांचा समावेश आहे. तिने एराडोंडाला मूरू, एटीएम, ओंडू काथे हेलवा आणि जॅकपॉट यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. शोभिताचा नुकताच रिलीस झालेला कन्नड चित्रपट ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ ने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता आणि अभिनेत्रीने सुद्धा तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रियपणे प्रचार केला होता. Source Aamar Ujala
